२१ डिसेंबर, १९०३ : आबासाहेबांचा तासगाव येथे जन्म 
१९२० : नशीब अजमावायला मुंबईस प्रयाण 
३ डिसेंबर १९२७ : विमलाबाईंशी विवाह 
१९२७-२८ : डेक्कन मोटर्सची स्थापना 
१९३३ : मोटार व्यवसायासाठी इंग्लंडला प्रयाण 
१९३४ : लंडनमध्ये कार्यालयाची स्थापना 
५ नोव्हेंबर १९३४ : मोठा मुलगा शशिकांतचा जन्म 
१९३५ : विश्वेश्वरय्या समितीबरोबर अमेरिकेचा दौरा 
१९३६ : मुलगा चंद्रकांत याचा जन्म 
१९३७ : गरवारे मोटर्सची स्थापना 
१५ ऑक्टोबर १९३८ : मुलगा अशोकचा जन्म 
१४ ऑक्टोबर १९४० : मुलगा रमेश याचा जन्म 
१९५६ : महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ याचे अध्यक्ष 
१९५७ : सरकारी शिष्टमंडळातर्फे इंग्लंड-अमेरिका दौरा 
६ जून १९५७ : गरवारे नायलॉन्सची स्थापना 
१९५८ : वरळी  येथे नायलॉन धाग्याच्या उत्पादनाची सुरुवात 
१९५९ : मुंबईच्या शेरीफपदी नियुक्ती 
१९५९ : मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय हीरक महोत्सव - प्रमुख पाहुणे
१९६१ : महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ, अध्यक्ष 
१९६२ : चिंचवड येथे नायलॉन उत्पादनाची सुरुवात 
१९६५ : देशांतर्गत पॉलिमरायझेशन उत्पादनाची सुरुवात 
५ डिसेंबर १९७० : मराठी विज्ञान परिषद नागपूर येथे अध्यक्षपद 
१९७१ : पदमभूषण पुरस्काराने सन्मानित 
६ ऑगस्ट १९७२ : गरवारे कॉलेजचे नामकरण 
२७ डिसेंबर १९७३ : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स सत्कार सोहोळा 
१९८९ : पुणे विद्यापीठाने D.Litt पदवी प्रदान केली 
१९८९ : IES, दिल्ली यांचा ‘उद्योगरत्न’ पुरस्कार 
२ नोव्हेंबर १९९० : पुणे येथे मृत्यू 
२००४ : आबासाहेबांच्या स्मरणार्थ पोस्टाचा स्टॅम्प