अभ्यास व लेखन
अभ्यास व लेखन
अरविंद सिद्धेश्वर म्हेत्रे
वैयक्तिक माहिती
नाव - अरविंद सिद्धेश्वर म्हेत्रे (वय : ५० वर्षे)
पत्ता - ५, 'बसव-गंगा', सिद्धेश्वर पार्क, जुळे सोलापूर, सोलापूर - ४१३००४
मूळ गाव - मंद्रूप, ता. द. सोलापूर
शिक्षण - माहिती तंत्रज्ञान पदवीधर
व्यवसाय - नोकरी : गेल्या २० वर्षांपासून माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापक म्हणून खाजगी संस्थेमध्ये कार्यरत. बिझनेस प्रोसेस मध्ये टेक्नॉलॉजी ट्रान्सफॉर्मेशन आणि ऑटोमेशन मध्ये विशेष कार्य.
सामाजिक
संस्थापक अध्यक्ष - निसर्ग माझा सखा परिवार, सोलापूर
पर्यावरण संवर्धनासाठी 'निसर्ग माझा सखा' या नोंदणीकृत संस्थेच्या माध्यमातून गेली ६ वर्षे कार्यरत. सार्वजनिक ठिकाणचे वृक्षारोपण-वृक्षसंवर्धन, शाळा आणि महाविद्यालयातून 'निसर्ग' विषयांवर 'विद्यार्थी संवाद', घर तिथे घरटे (स्पॅरो पार्क), घर तिथे झाड, पर्यावरणपूरकता, प्रदूषण निर्मूलन, गड-किल्ले आणि निसर्ग-भ्रमंती, निसर्ग-लेखन अशा उपक्रमांमधून निसर्ग संवर्धनाचा अखंड जागर.
लेखन
वाचन आणि लेखनाची आवड. विविध वर्तमानपत्रांमधून आणि नियतकालिकांमधून आजवर ३०० च्या वर लेख प्रकाशित. सोशल मीडियावर सातत्याने विविध विषयांवरचे लेखन. थिंक महाराष्ट्र या संकेतस्थळांवर लेख प्रकाशित.
पुस्तक प्रकाशन
१) 'फेसबुकस्नेहींची यशोगाथा' - २०१९ (वर्तमानातील आदर्श व्यक्तिमत्त्वांचा वेध घेणाऱ्या ५३ जणांचा लेख संग्रह)
२) 'प्रत्येकजण पर्यावरणप्रेमी' - प्रकाशनाच्या वाटेवर (निसर्ग-लेखन : आजवर प्रकाशित लेखांचा संग्रह)